अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फेडरेशन आयोजित विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं चार सुवर्णपदकं, २ रौप्य आणि २ कास्यपदकांसह आठ पदकं जिंकून चीननंतर दुसरं स्थान मिळवलं आहे.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, सौरभ चौधरी आणि सुरुची सिंग या भारतीय जोडीने कांस्यपदक जिंकले, तर सिफ्ट कौर समरा, रुद्रांक्ष पाटील, सुरुची सिंग, विजयवीर सिद्धू, ईशा सिंग, चैन सिंग आणि आर्या बोरसे या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी करत पदकांना गवसणी घातली.