भारतीय वनसेवा अधिकारी शोमिता बिस्वास यांनी काल नागपूर इथं महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक बनल्या आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिस्वास यांचं स्वागत केलं. राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि आता प्रधान मुख्य वनसंरक्षक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. बिस्वास या सध्या पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
Site Admin | August 1, 2024 2:52 PM | वनसंरक्षक | शोमिता बिस्वास
शोमिता बिस्वास यांनी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला
