‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. ‘पुसा-कृषी विज्ञान मेळा’ आज नवी दिल्ली इथं सुरु झाला. या मेळ्याचं उदघाटन चौहान यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.
‘उन्नत कृषी आणि विकसित भारत’ असं या मेळ्याचं उद्दिष्ट्य आहे. शेतकरी आणि शेतीशिवाय, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात सातत्यानं काम करत आहे, असं ते यावेळी म्हणाले.