राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंडनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅरा शूटींगसाठी सुमा शिरुर, दिव्यांगांच्या ॲक्वेटीक्सकरता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी शुभांगी रोकडे, जिम्नॅस्टिकसाठी पवन भोईर आणि कबड्डीसाठी अनिल घाटे यांना जाहीर झाला. खेळाडूंच्या श्रेणीमध्ये ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळे, नेमबाजीत रुद्रांश पाटील आणि शाहू माने, नौकायन विष्णू सर्वानन यांच्यासह इतर एकूण ४७ खेळाडूंना हे पुरस्कार जाहीर झाले. साहसी क्रीडा प्रकारात जल क्षेत्रात जयंत दुबळे आणि जमीन क्षेत्रात कस्तुरी सावेकर यांचा या पुरस्कारानं गौरव केला जाईल. दिव्यांग श्रेणीतही ६ महिला आणि २ पुरुषांना हे पुरस्कार मिळणार आहेत. २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या वर्षांसाठीही काही अतिरीक्त पुरस्कार राज्य सरकारनं आज जाहीर केले.
Site Admin | October 3, 2024 8:00 PM | प्रदीप गंधे | राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार