देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष गाडीला आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतिकिलो चार रुपये या माफक दरात मालवाहतूक करता येईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या दहा स्थानंकांचा अमृत स्थानक म्हणून विकास होईल असंही ते म्हणाले. दहा जनरल डबे आणि पार्सल व्हॅन असणारी ही गाडी नाशिकच्या देवळालीहून निघून बिहारमध्ये दानापूरला जाईल तर परतीच्या प्रवासात मनमाडला शेवटचा थांबा घेईल. राज्यातल्या शेतकऱ्यांना नाशवंत माल दुसऱ्या राज्यात वाहून नेणं या गाडीमुळे सोयीस्कर होईल.
Site Admin | October 15, 2024 5:01 PM | #ShetkariSamruddhiVisheshTrain