डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गंत येत्या १८ जूनला ९ कोटी ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १८ जूनला एका कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गंत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली. नवी दिल्लीत बातमीदारांशी ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांत आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन लाख कोटी रुपये हस्तांतरित केल्याचंही चौहान यांनी सांगितलं.

प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठल्याचंही चौहान यांनी सांगितलं. कृषी मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असलेल्या सर्व मुद्द्यांवर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा