डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशमधील अंतरिम सरकार करेल – सल्लागार मुहम्मद युनूस

गेल्या ऑगस्टमध्ये सरकार पडल्यानंतर सध्या भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगला देशमधील अंतरिम सरकार करेल, असं बांगलादेशचे विद्यमान मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे. इथल्या अंतरिम सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते देशाला संबोधित करत होते. आपलं सरकार सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही युनूस म्हणाले.

 

गेल्या ८ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारलेल्या युनूस यांनी दावा केला की हसीन सरकारच्या विरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि कामगारांसह सुमारे पंधराशे लोक मारले गेले असून १९ हजार ९३१ जण जखमी झाले होते. विवादास्पद नोकरी कोटा प्रणालीवर सरकारच्या विरोधात देशात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाल्यानंतर 77 वर्षीय हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा