डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 27, 2025 1:06 PM | Sharjeel Imam

printer

जामिया विद्यापीठ प्रकरणी शरजिल इमाम याची पुढची सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार

जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणातला आरोपी कार्यकर्ता शरजिल इमाम यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितलं आहे. इमाम याच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चितीचे आदेश दिले होते. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका इमाम याने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.

 

या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या एकलपीठासमोर आज सुनावणी झाली. या याचिकेसंदर्भात उत्तर दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहे. या याचिकेवर पुढची सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे.

 

इमाम याने १३ डिसेंबर २०१९ रोजी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात केलेलं भाषण चिथावणीखोर असून दोन धर्मांमधली तेढ वाढवणारं होतं, असं म्हणत त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा