जागतिक परिस्थितीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्सनं ७६ हजार आणि निफ्टीनं २३ हजारांच्या महत्त्वाच्या पातळीखाली बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ८२४ अंकांनी घसरुन ७५ हजार ३६६ अंकांवर बंद झाला. निफ्टी २६३ अंकांनी कोसळून २२ हजार ८२९ अंकांवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका वगळता इतर सर्वच क्षेत्रातले समभाग घसरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर लादलेल्या निर्बंधांमुळे देशातले शेअर बाजार कोसळले.
Site Admin | January 27, 2025 7:06 PM | share marke
शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण
