डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 6, 2025 7:42 PM | Mumbai Share Market

printer

HMPV संसर्गाचा शेअर बाजारातही मोठा परिणाम

देशात HMPV विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याचा विपरीत परिणाम देशातल्या शेअर बाजारांवरही आज झाला आणि दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात आपटले. सेन्सेक्स १ हजार २५८ अंकांनी घसरुन ७७ हजार ९६५ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३८९ अंकांनी घसरुन २३ हजार ६१६ अंकांवर स्थिरावला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या समभागांना आजच्या घसरणीचा मोठा फटका बसला. अमेरिकेच्या आर्थिक धोरणातले संभाव्य बदल, फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपातीसंदर्भातली आक्रमक भूमिका, चलनवाढीच्या दरात वाढ होण्याची भिती यासारख्या कारणांनीही शेअर बाजार कोसळल्याचे विश्लेषकांचं मत आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा