शेअर बाजार आज मोठ्या वाढीने बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पुन्हा ८० हजारांचा टप्पा ओलांडला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९९३ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ११० अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही ३१५ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार २२२ अंकांवर बंद झाला. आज दिवसभराच्या व्यवहारात तेल आणि वायू, भांडवली वस्तू आणि औद्योगिक क्षेत्रातील समभागांची सर्वाधिक खरेदी झाली.
Site Admin | November 25, 2024 7:19 PM | share marke