सातत्यानं होत असलेल्या तेजीमुळं देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यामुळं गुंतवणुकदारांच्या उत्पन्नात १७ लाख ४३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.
गेल्या ४ दिवसात सुरू असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स अडीच हजारांनी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर ८९९ अंकांची वाढ नोंदवून ७६ हजार ३४८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २८३ अंकांची वाढ होऊन २३ हजार १९१ अंकांवर बंद झाला.
देशातल्या संस्थांत्मक गुंतवणूक दारांनी सुरू ठेवलेली खरेदी यामुळं बाजारात तेजी दिसून आल्याचं विश्लेषकांचं मत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे संमिश्र परिणाम जगभरातल्या शेअर बाजारात दिसून आले.