शेअर बाजारात आज खरेदीचा जोर होता. दिवसाच्या सुरुवातीला ४३८ अंकांनी वर गेलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नंतर काहीसी विक्रीच्या दबावाखाली आल्याचं दिसलं, मात्र नंतर सातत्याने खरेदी झाल्यामुळं निर्देशांक १ हजार २१५ अंकांची झेप घेत ७५ हजारांची पातळी ओलांडून गेला.
दिवसअखेरीस किंचित खाली घसरून कालच्या तुलनेत १ हजार १३१ अंकांची तेजी नोंदवत सेन्सेक्स ७५ हजार ३०१ वर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी कालच्या तुलनेत ३२५ अंकांनी वधारुन २२ हजार ८३४वर बंद झाला.