सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ६१० अंकांची वाढ नोंदवून ७४ हजार ३४० अंकांवर बंद झाला. निफ्टी २०७ अंकांची वधारुन २२ हजार ५४५ अंकांवर बंद झाला. मागणीतली मंदी आणि चीनकडून आर्थिक प्रोत्साहन मिळाल्यानं कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली सुधारणा यामुळे ऊर्जा आणि धातू क्षेत्रात वाढ झाली तर डॉलर निर्देशांक कमकुवत होत असताना ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोतल्या वाहन निर्मात्यांवरच्या शुल्काच्या नरमाईच्या भूमिकेनंतर जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाले. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १ पूर्णांक ६३ शतांश टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक ६५ दशांश टक्क्यांनी वधारल्यानं बाजार तेजीत बंद झाले. आशियाई बाजारात टोकियो, शांघाय, हाँगकाँग आणि सेऊल हे निर्देशांक वधारले. ब्रेंट क्रूडचा भाव ५२ दशांश टक्क्यांनी वधारून ६९ डॉलर ७२ सेंट प्रति बॅरल झाला आहे.
Site Admin | March 6, 2025 7:42 PM | share market
सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी
