सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार ९ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजार ४१४ अंकांची घसरण नोंदवत ७३ हजार १९८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४२० अंकांनी घसरुन २२ हजार १२५ अंकांवर स्थिरावला. गेल्या वर्षी जून महिन्यात शेअर बाजार या पातळीवर होते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या तुलनेत बाजार १५ टक्क्यांनी घसरले आहेत.
जागतिक पातळीवर असलेलं अस्थिर वातावरण, अमेरिकेकडून विविध देशांवर लादले जाणारं आयात शुल्क, यासारख्या कारणांमुळे बाजारात घसरण सुरू असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं.