भारतीय शेअर बाजारातल्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये आज दिवसभर चढउतार पाहायला मिळाले. आज दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७ अंकांनी घसरून ७९ हजार ६४९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१ अंकांनी घसरून २४ हजार ३४७ अंकांवर बंद झाला. दरम्यान, आशिया खंडातल्या चार प्रमुख शेअर बाजारांमध्येही आज घसरण पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाच्या कोस्पी या बाजाराचा निर्देशांक १ टक्क्याने, हाँगकाँगच्या हँग सेंगचा निर्देशांक आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक शून्य पूर्णांक एक दशांश टक्क्याहून अधिक घसरला. तर सिंगापूरचा स्ट्रेट टाइम्सचा निर्देशांक शून्य पूर्णांक आठ टक्क्याने घसरला.
Site Admin | August 12, 2024 7:29 PM | Mumbai Share Market