डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शरद पवार यांचे सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत

राज्यसभेचा आपला दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असून यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या शिर्सुफळ इथं इथले पक्षाचे विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राजकारण फक्त निवडणूक आणि सत्तेसाठी नाही, तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी करायचं असतं, असं सांगून या भागात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा