आपला पक्ष सत्तेत जाणार या अफवा असून सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढच्या पंधरा दिवसात पक्षात मोठे बदल पाहायला मिळतील,असंही ते म्हणाले. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे, या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणूनच आपण सामोरे जाऊ, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.