दीर्घ काळ वंचित राहिल्यानंतर शिक्षणाची संधी मिळालेल्या समाजघटकांना आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झालेत. आधुनिकता आली, तंत्रज्ञान आलं. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केलं, त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी रयतच्या शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देऊ. रयत शिक्षण संस्था आधुनिक शिक्षणाचा दृष्टिकोन ठेवून वाटचाल करेल, असा मला विश्वास आहे, असं ते म्हणाले.