सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे, त्यांनी आज नाशिक जिल्ह्यात कळवण, दिंडोरी, निफाड इथं प्रचार सभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. कांद्याचा भाव वाढला की सरकार निर्यातबंदीचा विचार करून कांद्याचे भाव पाडतं, शेतकरी कर्जबाजारी हाेतात, त्यांना कर्जमाफी मिळत नाही मात्र, १६ उद्योगपतींचं १४ हजार कोटी रूपयांचं कर्ज माफ केलं, असं पवार म्हणाले.
दिंडोरी इथं सभेत त्यांनी, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे विश्वासघाती असल्याचा आरोप केला.