डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची स्थिती निर्माण झाली असल्यानं आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही – शरद पवार

मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची स्थिती निर्माण झाली असल्यानं आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नव्या मुंबईत वाशी इथं संभाजी ब्रिगेडच्या २७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते. 

शेत जमीन कमी होत असतानाच दुसर्‍या बाजूला शेतीवर बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे यशस्वीरित्या शेती करायची असेल तर आधुनिकतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतीच्या क्षेत्रात संशोधन होत आहे त्याचा आधार घेऊन उत्पादकता वाढवणं आणि शेती करत असताना त्याला जोड देणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.  

नव्या पिढीनं अर्थकारणाला महत्त्व दिलं पाहिजे. उद्योग, व्यवसाय काहीना काही तरी केलं पाहिजे. काम मागणारे अनेक असतात काम देणारे तयार करायचे आहेत. ही पिढी तयार करण्यासाठी दृष्टीकोन, विचारधारा बदलण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले. 

आपल्याला झेड प्लस सुरक्षा का दिली आहे, याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा