‘शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरीनं आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानं घडलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दाखवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
‘कोकणात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, फळबागा, अन्नधान्य, डाळी या सगळ्यासाठी प्रचंड संधी आहेत. त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली, तर कोकणाचा चेहरा आणखी बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.