संविधान बदलणं हा भाजपाचा हेतू असून, संविधानाला धक्का लागला तर नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामती इथं विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते.
आपल्या सत्ताकाळात आपण कारखाने, एमआयडीसी उभारून हजारो रोजगार निर्माण केले. मात्र महायुती सरकारच्या काळात राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला नेण्यात आले असा आरोप पवार यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
महायुती सरकारला निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीची आठवण झाली, मात्र गेल्या काही वर्षात राज्यातल्या ६७ हजारापेक्षा जास्त महिलांवर अत्याचाराची प्रकरणं झाली असून, ६४ हजारापेक्षा जास्त मुली, महिला बेपत्ता आहेत अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केली. ते बारामती इथं विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते. आपल्या सत्तेच्या काळात आपण कारखाने, एमआयडीसी उभारून हजारो रोजगार निर्माण केले. मात्र महायुती सरकारच्या काळात राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला नेण्यात आले असा आरोप पवार यांनी केला. संविधान बदलणं हा भाजपाचा हेतू आहे. संविधानाला धक्का लागला तर नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येतील, असं सांगत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.