लोकसभा निवडणुकीत भाजपानं ४०० हून अधिक जागा मिळवण्याचा निर्धार केला होता, तो पूर्ण झाला असता तर संविधान बदलण्याचा धोका निर्माण होऊ शकला असता, मात्र जनतेच्या जागरूकतेमुळे हे घडलं नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते जळगाव इथं प्रचारसभेत बोलत होते. भारतीय घटनेच्या संरक्षणासाठी सावधान राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
देशातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीवरही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. एका वर्षात ९०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही, असं ते म्हणाले. युवा आणि महिलांच्या समस्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.