डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन

राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करत १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केलं. महामार्ग रद्द न केल्यास मोजणी अडवण्यात येईल, तसंच, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. विरोधी पक्षातले अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

 

शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही. या महामार्गात जमीन अधिग्रहण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चर्चा करू, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पण हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो होणारच, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं.  या महामार्गाविरोधात शेतकरी आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केल्यानंतर ते बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा