केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या 360 पेक्षा जास्त व्हायब्रंट गावांमध्ये, यावर्षी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत फोर जी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात व्हायब्रंट गांवांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गच्या 662 गावांपैकी 474 गावांमध्ये ऑन-ग्रीड आणि 127 गावांमध्ये ऑफ-ग्रीड पद्धतीनं विद्युतीकरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. या व्हायब्रंट गावांमध्ये व्हायब्रंट पायाभूत सुविधा, दळणवळणीय जोडणीच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 25, 2025 3:41 PM | Home Minister Amit Shah
व्हायब्रंट गावांमध्ये यावर्षीच्या जून अखेरीपर्यंत फोर-जी सुविधा उपलब्ध करणार- अमित शाह
