राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दुर्गम भागातल्या आणि योग्य संपर्क यंत्रणा नसलेल्या नागरिकांना मतदान करता यावी यासाठी ९१५ मतदान केंद्रं उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. अशा प्रकारच्या मतदान केंद्रांना शॅडो मतदान केंद्रं असं म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ तर सांगलीत केवळ एकच शॅडो मतदान केंद्र असेल. ही शॅडो मतदान केंद्रं २४ जिल्ह्यांमध्ये असून यामध्ये मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असतील. त्यात विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ हे उच्च क्षमतेचे फोन, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वन आणि पोलीस विभागाचा रनर यांचा समावेश आहे. या बरोबरच बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार नाहीत.
Site Admin | October 26, 2024 8:02 PM | शॅडो मतदान केंद्रं