डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 24, 2024 2:46 PM | Cyclone 'Dana'

printer

‘दाना’ चक्रिवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रिवादळ आज मध्यरात्री ओडिशा किनारपट्टीवरच्या भितरकनिका आणि धामरा या प्रदेशांदरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दानाच्या भूभागावरचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असून उद्या पहाटेपर्यंत त्याचा प्रभाव राहील. सध्या हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीपासून २४० किलोमीटर अंतरावर असून ते ताशी १२ किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. या वादळामुळे ओडिशातील केंद्रपारा, बालासोर, मयूरभंज, जगतसिंगपूर आणि भद्रक या जिल्ह्यांत जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना समुद्रात जायला बंदी घालण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका असल्याने ओडिशाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच, भुवनेश्वर इथल्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणं आज संध्याकाळी पाच ते उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत रद्द झाली आहेत. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना मदत केंद्रात हलवण्यात येत असून सर्व शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं तसंच अनेक सरकारी संस्था शुक्रवारपर्यंत बंद राहतील. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा