हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरमध्ये पुढच्या पाच दिवसांत थंडीची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पंजाब आणि राजस्थानमध्येही सोमवारपर्यंत हीच परिस्थिती असेल. हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि झारखंडच्या काही भागात उद्यापर्यंत दाट धुकं पडेल, तर दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस संध्याकाळी आणि रात्री हलकं धुकं पसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत आज सकाळी धुक्याची हलकी चादर पसरली होती. दरम्यान, मध्य भारतात पुढच्या चार दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.
Site Admin | December 21, 2024 4:37 PM | Weather Update