राज्यात नोव्हेंबर महिन्यातच थंडीची तीव्र लाट पसरली आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सर्वाधिक गारवा जाणवत असून जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा कमी राहिलं. येत्या तीन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यभरात तापमानात लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा जोर वाढत आहे. परभणी जिल्ह्यात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. विदर्भातही तापमान कमी असून, अमरावती जिल्ह्यात सकाळी बारा अंश सेल्सिअस तर धारणी-चिखलदरा इथं नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत काल किमान तापमान सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून गेल्या आठ वर्षातला हा सर्वात थंड दिवस असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
Site Admin | November 30, 2024 3:25 PM | Maharashtra | weatherupdate