डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुण्यात आढळला झिका विषाणूचा सातवा रुग्ण

पुणे शहरातील डहाणूकर कॉलनीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळला आहे. ४५ वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिला असून तिला सौम्य लक्षणे आहेत.यापूर्वी निदान झालेल्या पाच महिलांपैकी दोन गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.राज्यात झिका विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत.या विषाणूचा गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास गर्भाच्या वाढीवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे वैद्यकीय चिकीत्सकांना काटेकोर देखरेख ठेवण्याबाबत दक्ष राहण्यास सांगावं अशी सूचना मंत्रालयानं केली आहे. रुग्णालयांनी देखरेख ठेवण्यासाठी विशेष अधिकारी नेमावा,परिसर एडिस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती मोहीम राबवावी, विषाणूसंसर्ग वेळीच ओळखून त्याचा प्रसार रोखावा, सतर्क राहून सर्व वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री करावी अशा सूचनाही आरोग्य मंत्रालयानं केल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा