डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार

तेलंगणात, मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान सात जहाल नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव भद्रू उर्फ ​​पपण्णा हा विजापूरचा असून इतर दोन राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी दोन आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली.
एटुरनगरम भागात नक्षलविरोधी कमांडो पथकाला आज सकाळी शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दोन एके-४७ रायफलही त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत

सर्वाधिक वाचले

सर्व पहा