जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तेरा वर्षांपासून अवैधरित्या राहत असणाऱ्या परकीय नागरिकांना शोधण्यासाठी प्रशासनाने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवणं आणि अवैध स्थलांतर रोखणं हा यामागचा हेतू आहे. गृह विभागाच्या प्रशासकीय सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती जम्मू काश्मीरमध्ये २०११ पासून अवैधरीत्या राहणाऱ्या नागरिकांना शोधून काढेल. अवैध स्थलांतरितांची वैयक्तिक आणि बायोमॅट्रिक माहिती गोळा करणं, आणि अद्ययावत डिजिटल नोंदी ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे.
Site Admin | July 11, 2024 3:25 PM | गृह विभाग | जम्मू-काश्मीर