केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २१ व्या आसियान – भारत अर्थ मंत्र्यांची बैठक आणि १२व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जाणार आहेत. वाणिज्यमंत्री या दौऱ्यात,या बैठकांशिवाय भागीदार देशांच्या समकक्ष मंत्र्यांबरोबर अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. तसंच, ते लाओस, कोरिया, मलेशिया, स्विझर्लंड आणि म्यान्मार या देशांच्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत. गोयल आसियानचे महासचिव तसंच आशिया प्रशांत क्षेत्रातली प्रमुख संशोधन संस्था ‘एरिया’ च्या अध्यक्षांचीही भेट घेणार आहेत. यासोबतच ते लाओसमधल्या भारतीय समुदायाची भेट घेणार आहेत.
Site Admin | September 20, 2024 1:57 PM | Union Minister Piyush Goyal
केंद्रीय मंत्री पियुष गोयल २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर
