आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि स्पेनचे माजी उपप्रधानमंत्री रॉड्रिगो राटो यांना स्पेनमधल्या न्यायालयाने ४ वर्ष ९ महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. ७५ वर्षांचे रॉड्रिगो कर फसवणूक, मनी लॉण्डरिंग आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरले आहेत. स्पेनच्या करविभागाला फसवून सुमारे ८ कोटी ५० लाख डॉलर्सची कमाई केल्याचा तंच बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यापूर्वी २०१७ मधे राटो यांना एका बँकेला फसवल्याच्या आरोपाखाली साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
Site Admin | December 21, 2024 4:36 PM
स्पेनचे माजी उपप्रधानमंत्री रॉड्रिगो राटो यांना तुरुंगवासाची शिक्षा
