मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा ७८ हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर सेन्सेक्स ७१२ अंकांची वाढ नोंदवत, ७८ हजार ५४ अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं ७८ हजार १६५ अंकांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता.
निफ्टीनंही आज पहिल्यांदाच २३ हजार ७०० अंकांची पातळी ओलांडली. दिवसअखेर निफ्टी १८३ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ७२१ अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकही पहिल्यांदाच ५२ हजारांच्या पलीकडे जाऊन स्थिरावला.
बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातल्या समभागांमुळं बाजारात आज तेजी झाली.