मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदा ८४ हजार अंकांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर पहिल्यांदा बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं विक्रमी पातळी गाठली. दोन्ही निर्देशांकांत सकाळपासून सुरू झालेली तेजी अखेरपर्यंत वाढत गेली.
दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ३६० अंकांची तेजी नोंदवून ८४ हजार ५४४ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३७५ अंकांची वाढ नोंदवून २५ हजार ७९१ अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीनं यंदा ५४ हजार अंकांची पातळी पहिल्यांदाच ओलांडली. वाहन, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, औषध, धातू अशा सर्वच क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते.