सलग पाच सत्रांमधल्या घसरणी नंतर शेअर बाजारात आज तेजीचा जोर राहिला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज तब्बल १ हजार २९३ अंकांची उसळी घेतली आणि तो ८१ हजार ३३३ अंकांवर बंद झाला.
बाजार बंद होण्यापूर्वी झालेल्या खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टिनं आज २४ हजार ८६१ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला. मात्र तो नंतर थोडा खाली आला, आणि दिवसअखेर ४२९ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ८३५ अंकांवर बंद झाला.
धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या समभागांनी आज सर्वात जास्त तेजी नोंदवली, तर वाहन उद्योग, फार्मा आणि बांधकाम क्षेत्रातले समभाग देखील आज तेजीत होते