भविष्यात एखाद्या कंपनीच्या समभागांची किंमत वाढणार आहे असा अंदाज बांधून शेअर बाजारात केलेल्या खरेदी- विक्रीमुळे वैयक्तिकपणे व्यवहार करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर अशा व्यवहारांमधून देशातल्या गुंतवणूकदार संस्था आणि परदेशी गुंतवणूकदार संस्था नफा कमावत असल्याचा निष्कर्ष सेबी अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. शेअर बाजारात वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या वाढत असल्यामुळे सेबीनं हा अभ्यास केला.
या तीन वर्षांमध्ये वैयक्तिकपणे व्यवहार करणाऱ्यांना एक लाख आठ हजार कोटी रूपयांचं नुकसान सोसावं लागल्याचं सेबीनं म्हटलं आहे. तर वित्तीय संस्थांना ३३ हजार कोटी आणि परदेशी गुंतवणूकदार संस्थांना २८ हजार कोटी रूपयांचा नफा झाला आहे. २०२३ मधे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या ३० वर्षांखालच्या युवकांंचं ३१ टक्के असलेलं प्रमाण २०२४ मधे ४३ टक्के इतकं वाढलं आहे, असं सेबीनं म्हटलं आहे.