अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर आज देशातल्या शेअर बाजारातल्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्सनं आज सकाळच्या सत्रात ८३ हजार ७७४ आणि निफ्टीनं २५ हजार ६१२ या पातळीला स्पर्श केला. पण त्यानंतर दोन्ही शेअर बाजारात घसरण सुरू झाली. दिवसअखेर सेन्सेक्स २३७ अंकांची वाढ नोंदवून ८३ हजार १८५ अंकांवर बंद झाला. निफ्टीनं ३८ अंकांची वाढ नोंदवली आणि हा निर्देशांक २५ हजार ४१६ अंकांवर स्थिरावला. फेडरल रिझर्व्हनं काल ४ वर्षानंतर पहिल्यांच व्याजदरात कपात केली आहे. बँकेनं त्यांच्या व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात करुन हा दर पावणे ५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान नेला आहे.
Site Admin | September 19, 2024 7:26 PM | Sensex | share market