डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 7, 2025 6:52 PM | Nifty | Sensex

printer

अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळं जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हाहाकार माजला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली. यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडे १३ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. 

 

दिवसअखेर सेन्सेक्स २ हजार २२७ अंकांनी घसरुन ७३ हजार १३८ अंकांवर बंद झाला. निफ्टी ७४३ अंकांची घट नोंदवून २२ हजार १६२ अंकांवर स्थिरावला. सत्रादरम्यान सेन्सेक्स सुमारे ४ हजार आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला होता. त्यामुळं सेन्सेक्स ७२ हजारांच्या खाली निफ्टी २२ हजारांच्या खाली गेला होता. या घसरणीचा सर्वाधिक फटका धातू आणि बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांना जाणवला. माहिती तंत्रज्ञान, बँका, वाहन उद्योग, वित्तीय सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांचेही समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. बुधवारी या बैठकीतले निर्णय जाहीर होतील, त्याकडे शेअर बाजाराचं लक्ष असल्याचं विश्लेषकाचं मत आहे.

 

जगभरातले इतर शेअर बाजारही आज मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अमेरिका, युरोप, जपान, आशियामधल्या निर्देशांकांमध्ये ४ ते ७ टक्क्यांची घट दिसून आली.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा