अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरकपातीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ९६४ अंकांची घसरण झाली आणि तो ७९ हजार २१८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९५१ अंकांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जागतिक पातळीवरच्या विक्रीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर झाला. विशेषतः बँकिंग आणि रिअल इस्टेट या सारख्या क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे.
तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसत होता. १६ डिसेंबर रोजी सेन्सेक्समध्ये वाढ दिसून आली होती. मात्र, त्यानंतर सेन्सेक्समध्ये आजपर्यंत सुमारे २ हजार अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे.