पुण्यातल्या शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. काल सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंडित वसंतराव गाडगीळ यांचं व्यक्तिमत्व संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी समर्पित होतं. प्राचीन संस्कृत ग्रंथ, वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत अध्यापन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, शारदा संस्कृत मासिक, असं विविधांगी कार्य त्यांनी केलं. ते संस्कृत भाषेत संभाषण करत असत; संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी त्यांनी देशा-परदेशात अनेक व्याख्यानंही दिली.
Site Admin | October 19, 2024 10:54 AM | Pandit Vasantrao Gadgil | Senior Sanskrit scholar