डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा देव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वीणा देव यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस  त्या आजारी होत्या. वीणा देव या दिवंगत इतिहास अभ्यासक आणि लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ९ च्या सुमारास पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितलं.

पुण्यातल्या शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षं मराठीचं अध्यापन केलं. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले.

कधीकधी‘, ‘परतोनी पाहे‘, ‘स्त्रीरंग‘, ‘विभ्रम‘, ‘स्वान्सीचे दिवसही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या आशक मस्त फकीरया पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. राज्य शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार देण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा