ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज पहाटे मुंबईत त्यांचं राहत्या घरी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन त्यांनी केलं होतं. ‘गिरणगावचा पंढरी’ आणि ‘पत्रकार पंढरी’ ही त्यांची आत्मचरित्रं विशेष गाजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सावंत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
Site Admin | February 8, 2025 7:14 PM | Pandharinath Sawant | Senior journalist
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
