बिहार मधले IAS अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजीव हंस आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार गुलाब यादव यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. IAS सेवेतल्या अधिकाऱ्याला त्याच्या पाटणा इथल्या सरकारी निवासस्थानातून अटक केली तर गुलाब यादवला काल संध्याकाळी दिल्लीतल्या एका रिसॉर्ट मधून ताब्यात घेण्यात आलं.
केंद्रीय एजन्सीच्या गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांनी संजीव हंस यांच्या संदर्भात पाटणा आणि दिल्लीतल्या विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. या दोघांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी विशेष दक्षता युनिटनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं त्यांच्या वर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता. देशभरातल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ५६ कोटींहून अधिक किंमतीच्या एकूण ३५ स्थावर मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं केल्या जप्त केल्या आहेत. याआधीही ईडीनं २१ कोटींहून अधिक किंमतीच्या १६ स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या.