काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार E V K S एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. द्रविड चळवळीचे प्रणेते ई व्ही रामासामी पेरियार यांचे भाऊ ई व्ही क्रृष्णसामींचे ते नातू होत. एलंगोवन २००४ ला गोपीचेट्टीपलयम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. २००४ ते २००९ या काळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम केलं होतं. एरोड पूर्व मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेतही ते दोनदा निवडून आले होते.