काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं काल धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील. रोहिदास पाटील यांनी धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली; त्यानंतर 1980 मध्ये ते तत्कालीन कुसुंबा आणि आताच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. विविध खात्यांचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं. रोहीदास पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
Site Admin | September 28, 2024 9:06 AM | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते | निधन | मंत्री रोहिदास पाटील
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन
