सेनेगलचे अध्यक्ष बसीरो दिओमाये फाये यांनी संसद विसर्जित केली आहे. यामुळं आता निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेनेगलच्या घटनेनुसार ९० दिवसात निवडणुका होणे अपेक्षित आहे. दूरचित्रवाणीवरुन प्रसारित केलेल्या भाषणात फाये यांनी ही घोषणा केली. विद्यमान संसदेत त्यांच्या विरोधी पक्षाला बहुमत होतं. कारागृहातून सुटल्यावर २ आठवड्यात ते अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले होते.
Site Admin | September 13, 2024 11:54 AM | President Bassirou Diomaye Faye | Senegal