डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये पुरुष संघांत सेना दल संघाला तर महिलांच्या संघांत केरळला सुवर्ण पदक

व्हॉलीबॉलमधे पुरुष संघांच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात सेना दल संघाने केरळचा ३-१ असा पराभव करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. सेना दल संघाने पहिले दोन सेट २५-२० आणि २५-२२ असे जिंकले. तिसऱ्या सेटमधे केरळने जोरदार टक्कर देत सेना दल संघाला २५-१९ असं नमवलं. मात्र चौथ्या सेटमध्ये सेना दल संघाने केरळला २५-१९ च्या फरकाने हरवून सुवर्ण मिळवलं.
कांस्य पदकाच्या सामन्यासाठी तामिळनाडूने उत्तराखंडला ३-० असं हरवलं.
महिलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळने तामिळनाडूचा ३-२ असा पराभव केला. पहिला सेट केरळने २५-१९ असा जिंकला. मात्र पुढच्या दोन सेटमधे तामिळनाडूने २५-२२, २५-२२ ने केरळला नमवलं. शेवटच्या सेटमध्ये १५-७ असा विजय मिळवत केरळने सुवर्ण आपल्या खात्यावर नोंदवलं.
कांस्य पदकाच्या सामन्यात राजस्थानने चंदीगडला ३-० नं हरवलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा